Latest

विराट आणि सूर्यकुमार यांचा ‘आयसीसी’च्‍या Most Valuable Team मध्‍ये समावेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी ) आज (दि. १४) टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेतील Most Valuable Team जाहीर केली. यामध्‍ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज सूर्यकुमार यांचा समावेश करण्‍यात आला आहे. या संघात यंदाच्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट कामगिरी करणार्‍या सहा देशांमधील क्रिकेटपटूंना स्‍थान देण्‍यात आलं आहे.

Most Valuable Team मधील क्रिकेटपटूंची निवड आयसीसीचे महाव्‍यवस्‍थापक वसीम खान, माजी क्रिकेटपटू इयान बिशप,  माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉल, समालोचक मेल जोन्‍स, पत्रकार पार्थ भादुरी यांच्‍या समितीने केली आहे.

आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2022 Most Valuable Team पुढील प्रमाणे : इंग्‍लंडचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स, इंग्‍लंडचा कर्णधार जोस बटलर, इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड,भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव, न्‍यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स, झिम्बाब्वेचा फिरकीपटू सिकंदर रझा, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, पाकिस्‍तानचा फिरकीपटू शादाब खान, इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करण, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजे. १२वा खेळाडू म्‍हणून भारताचा अष्‍टपैलू हार्दिक पंड्या याची निवड करण्‍यात आली आहे.

Most Valuable Team : विराट अणि सूर्यकुमारची कामगिरी ठरली उल्‍लेखनीय

यंदाच्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज सूर्यकुमार यांची कामगिरी उल्‍लेखनीय ठरली आहे. विराट कोहलीने या विश्‍वचषकाची सुरुवातच धडाकेबाज केली होती. त्‍याने पहिल्‍याचा सामन्‍यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावा केल्‍या. विराट कोहलीने या स्‍पर्धत ९८.६६ सरासरीने २९६ धावा केल्‍या. भारताच्‍या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने या स्‍पर्धेत आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्‍याने १८९.६८ स्ट्राइक रेटने 239 धावा केल्या.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT