Latest

Virani wedding : शिवानी-विराजस कुलकर्णी यांचे शुभमंगल (Exclusive Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांचे शुभमंगल पार पडले. (Virani wedding) दोन -तीन दिवसांपूर्वी शिवानीच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडलाय. त्यावेळचे मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. शिवानीने आपल्या लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे- Finally! ❤️ (Virani wedding)

तिने यासोबतच एक हार्ट इमोजी शेअर केलीय. सोबतच #married #couple #thisisus असे टॅगदेखील दिले आहेत.

आता विराजस आणि शिवानी यांच्या लग्नातील एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ तुमच्य़ासाठी घेऊन आलो आहोत.

विरानी यांच्या लग्नातील खास व्हिडीओमध्‍ये विराज आणि शिवानी दोघेही खूप आनंदात दिसताहेत. या व्हिडीओमध्‍ये विराजसची आई मृणाल कुलकर्णीही दिसताहेत. विराजस आणि शिवानी वर आणि वधूच्या पोशाखात खूप सुंदर दिसताहेत. शिवानीने सुंदर साडी नेसली असून त्यावर कमरपट्टा, आणि नाकात नथ घातलेली आहे. तिचे मधूर हास्य सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे.

ती खूप आनंदी असल्याचे या व्हिडिओत दिसते आहे. अभिनेत्री आणि शिवानीची सासू मृणाल कुलकर्णीही सिल्क साडीत खूप सुंदर दिसताहेत. विराजसची आई मृणाल कुलकर्णी एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. विराजसने 'माझा होशील ना' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून काम केले आहे. या मालिकेतून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. शिवानी रांगोळेदेखील 'सांग तू आहेस का?' मालिकेत भूमिका केली होती. तिचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील लूक लक्षवेधी ठरला होता. 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर' ही तिची मालिका गाजली होती.

'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली होती. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 'बनमस्का' मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली.

हेदेखील वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT