Latest

फडणवीस यांना भेटले विनोद पाटील, म्हणाले मी लढणारच, माझ्याकडे विजयाचं गणित !

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे संदीपान भुमरे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपामधील अस्वस्थता वाढली आहे. मराठा नेते विनोद पाटील यांनी आज नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरमपेठ निवासस्थानी भेट घेतली. मी लढणारच, माझ्याकडे विजयाचे गणित आहे असे त्यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्‍यांच्या या भूमीकेने महायुतीच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही मला उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा होती. मात्र, त्या ठिकाणी महायुतीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. पुनर्विचार होईल अशी मला अजूनही अपेक्षा आहे. या मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचे मुद्देसूद गणित आहे. ती चर्चा करण्यासाठीच मी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असे प्रतिपादन मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी केले.

केवळ कुठलेही आश्वासन मिळावे यासाठी ही भेट नव्हती तर मतदार संघाची एकंदर काय स्थिती आहे, पुन्हा एकदा ती तपासली गेली पाहिजे यासाठी ही भेट होती. मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता महायुतीने ते ठरवायचं आहे. आजची चर्चा सकारात्मक झाली अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दिली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT