Latest

विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात, मेटे गंभीर जखमी, उपचार सुरू

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी 5 वाजता हा अपघात झाला. अपघातात मेटे यांना हात-पाय आणि डोक्याला मार लागला आहे. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, खूप वेळ फोन करूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटेंच्या सहका-यांनी दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार दरेकर हे रुग्णालयात मेटे यांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत, अशी माहिती येत आहे. तसेच मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार अशी माहिती मिळत आहे.

SCROLL FOR NEXT