Latest

अजित पवार इतके तडफडत का आहेत? ते बारामतीत निवडून येणे अशक्यच : विजय शिवतारेंचा आक्रमक निशाणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विजय शिवतारे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी दिड तास वेळ दिला. युतीधर्म पाळण्याचा मुख्यमंत्री शिंदेंनी विजय शिवतारेंना सल्ला दिला. सत्तेतून मिळालेली अराजकता पवारांची आहे, ती मोडण्याची गरज आहे. बारामतीत अजित पवार निवडून येणार नाहीत. ती जागा युतीची जाणारचं आहे. बारामतीची गणितं मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितली. मी त्यांना म्हणालो, साहेब मी आपल्या शब्दाबोहर नाही. पण जनतेचा शब्द देखील तितकाचं महत्त्वाचा आहे. पुण्याला गेल्यानंतर पुढील दिशा ठरवणार. दोन-चार दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. बारामतीत अजित पवारांविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे निश्चितपणे बारामतीतून अजित पवार निवडून येणे अशक्यच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील लोकांचे पैसे वापरून आपला पक्ष वाढवायचा सुरु आहे. अजित पवार मला धमक्या देतात. अरे विजय शिवतारे तुझा आवाका काय? तू करतोस काय? तुला बघून घेतो, अशा धमक्या विजय शिवतारे का देत आहेत? अजित पवार इतके तडफडत का आहेत?

सुनील तटकरेंनी टीका केली यावर विजय शिवतारेंवर, मी त्यांचा आदर करतो, त्यांनी माझ्या बद्दल बोलू नये.
अजित पवारांच्या उमेदवाराला अजिबात मदत करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT