Latest

Maharaja film : ‘जवान’नंतर विजय सेतुपती करणारा मोठा धुमधडाका, महाराजाचा फर्स्ट लूक रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जवान'च्या यशानंतर अभिनेता विजय सेतुपतीचा आगामी चित्रपट 'महाराजा'चा फर्स्ट लुक (Maharaja film) पोस्टर जारी केला आहे. विजयने रविवारी चेन्नईमध्ये हे पोस्टर जारी केलं आहे. 'महाराजा' हा विजय सेतुपतीचा ५० वा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन निथिलन करत आहेत. (Maharaja film )

महाराजाचा जो फर्स्ट लूक पोस्टर जारी केलं आहे, त्यामध्ये विजय हा रक्ताने माखलेल्या शर्ट आणि पँटमध्ये हातात मोठी विळी घेऊन पोलिस स्टेशनमध्ये बसलेला दिसत आहे. तिच्या कानावर पट्टी बांधलेली दिसत आहे. चेन्नईमध्ये पोस्टर रिलीज केल्यानंतर सेतुपतीने म्हटलं की, त्याला ५० चित्रपट करण्याची देखील अपेक्षा नव्हती. हे एका मैलाच्या दगडाप्रमाणे आहे.

७ सप्टेंबर रोजा रिलीज झाला होता 'जवान'

विजय सेतुपतीचा हा चित्रपट 'जवान' ७ सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. सोबत विजय सेतुपती आणि नयनतारादेखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीय. या चित्रपटाची कमाई ४ दिवसात ३०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचली आहे.

SCROLL FOR NEXT