Latest

Lalita Lajmi : गुरुदत्त यांच्या बहिण आणि ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ चित्रकार तथा दिवंगत प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या बहिण ललिता लाझमी यांचे मुंबईत निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. चित्रपट निर्माते खालिद मोहम्मद यांनी त्यांचे निधन झाल्याचे अधिकृत माहिती ट्वीटद्वारे दिली. चित्रकार म्हणून देशात सुपरिचित होत्या. गेले अनेक दिवस त्या आजारी होत्या, उपचारादरम्यान अखेर सोमवारी (दि. १३) त्यांची प्राणज्योत मालवली. (Lalita Lajmi)

ललिता लाजमी यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबियात झाला होता. त्यांचे आई – वडील सुरुवातीला कारवार येथे व नंतर बंगळुरु येथे स्थायिक झाले. त्यांचे वडील कवी तर त्यांच्या आई लेखिका होत्या. घरातूनच कलेला वारसा लाभल्याने त्यांचे भाऊ गुरुदत्त यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून ६० च्या दशकात नावलौकिक मिळवला होता. ललिता लाजमी यांचे काका बी. बी. बेनेगल यांच्यामुळे त्यांना चित्रकलेची प्रेरणा मिळाली व पुढे त्यांनी बहुचर्चित चित्रकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या कलेवर भाऊ गुरुदत्त, दिग्दर्शक सत्यजीत रे आणि राज कपूर सारख्या दिग्गजांचा प्रभाव होता. (Lalita Lajmi)

त्यांचा कॅप्टन गोपी लाजमी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी होती त्यांचे नाव कल्पना लाजमी. कल्पना लाजमी या देखिल प्रसिद्ध दिग्दर्शिका होत्या. २०१८ साली त्यांचे गंभीर आजारने निधन झाले. त्यांनी 'रुदाली' सारखा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ललिता लाजमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार होत्या. भारतातसह परेदशात देखिल त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जात असे व त्यांच्या चित्रांना चांगली मागणी होती. चित्रकले सोबतच त्या चित्रपटांशी सुद्धा निगडीत होत्या. त्यांनी अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या नाटकांसाठी वेशभूषेचे काम पाहिले आहे. तसेच त्यांनी अमिर खान याच्या 'तारे जमीन पर' या प्रसिद्ध चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT