Latest

Varanasi Cricket Stadium : डमरूच्या आकाराचे पॅवेलियन, अर्धचंद्राकृती छत; पाहा वाराणसी स्टेडियमचे डिझाइन

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Varanasi Cricket Stadium : वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची पायाभरणी करण्यात आली. यावेळी मोदी यांनी सांगितले की हे स्टेडियम महादेवाला समर्पित असणार आहे. 450 कोटी रुपये खर्चून 30 एकरमध्ये बांधण्यात येणारे हे स्टेडियमची संपूर्ण बांधणी महादेवांच्या प्रतिकांप्रमाणे असणार आहे. हे स्टेडियम कसे असेल याचे मॉडेल फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X खात्यावर पोस्ट केली आहेत. जाणून घेऊ या कसे असणार आहे या स्टेडियमचे स्ट्रक्चर…

संबंधित बातम्या :

Varanasi Cricket Stadium : अर्धचंद्राकृती आकाराप्रमाणे असणार छत

या स्टेडियमचे छत हे अर्धचंद्राकृती आकारातील असणार आहे. ज्या प्रमाणे शिवाच्या मस्तकावर चंद्रकोर असते. तशाच आकाराचे या स्टेडियमचे हे अनोखे छत असणार आहे. चंद्रकोरीप्रमाणे छत असलेल्या या स्टेडियमच्या अन्य वास्तू देखील भगवान शिवाच्या प्रतिकांच्या असणार आहेत.

Varanasi Cricket Stadium : फ्लडलाइट्स असणार त्रिशूलाप्रमाणे

भगवान शिवाच्या प्रतिकांची प्रेरणा या स्टेडियमच्या वास्तुकलेत सर्वत्र आढळणार आहे. स्टेडियममधील सर्व फ्लडलाइट्स या त्रिशुलाच्या आकाराच्या असणार आहेत. अर्थात त्रिशुलाच्या आकाराच्या खांबांमध्ये फ्लडलाइट्स फिट करण्यात येणार आहे.

आसन व्यवस्था एखाद्या नदीच्या घाटावर बसल्याप्रमाणे भासणार

या स्टेडियमचे छत हे शिवाच्या मस्तकावरील अर्धचंद्रकोरीप्रमाणे असणार आहे. तर स्टेडियममध्ये बसण्यासाठी ज्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. ते नदीच्या घाटावरील शिड्यांप्रमाणे भासतील. या स्टेडियममध्ये 30 हजार लोकांची बसण्याची क्षमता असणार आहे.

Varanasi Cricket Stadium : डमरूच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण पॅवेलियन

तर या स्टेडियमचे मीडिया सेंटर आणि पॅवेलियन हे डमरूच्या आकाराचे असणार आहे. अशा आकाराचे पॅवेलियन आतापर्यंत कुठेही पाहायला मिळणार नाही. त्यामुळे हे स्टेडियम खूपच खास दिसणार आहे. याशिवाय पुढील भागावर शिवाला प्रिय असणाऱ्या बिल्व पत्राच्या आकारातील धातूच्या चादरांचे डिजाइन विकसित केले जाणार आहे.

काशी ही भगवान शिवाची नगरी आहे. त्यामुळे हे स्टेडियम पूर्णपणे महादेवाला समर्पित असणार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी करताना म्हटले आहे. या स्टेडियमच्या पायाभरणी वेळी सचिन तेंडुलकर, कपिलदेवसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT