Latest

Vande Bharat Trains: रेल्वे स्थानकावरील मॉलचा स्थानिकांना फायदा- मुख्यमंत्री शिंदे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.१२) १० नवीन वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामधील एक वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला देखील मिळाली आहे. यापूर्वी राज्याला ७ वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. देशातील रेल्वे क्षेत्रात मोठा विकास होत आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या मॉलचादेखील स्थानिकांचा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज (दि.१२) माध्यमांशी बोलत होते. (Vande Bharat Trains)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आज (दि.१२) करण्यात आले. आज नव्या १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच हे राष्ट्राला समर्पित करण्यात आले. वन नेशन, वन प्रोडक्ट संकल्पनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर मॉल उभारण्यात येणार असून, स्थानिक लोकांना यांचा मोठा फायदा होणार असल्याचेही शिंदे म्हणाले. रेल्वे क्षेत्रातील या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार देखील मानले. (Vande Bharat Trains)

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT