Latest

Vande Bharat Express: ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करणाऱ्या भारताचे प्रतीक ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : आज नवीन भारत उदयाला येत आहे. हा नवा भारत आपली स्वप्ने आणि आकांक्षेसाठी प्रयत्नशील आहे. असा भारत ज्याला वेगाने वाटचाल करून आपली ध्येय गाठायचे आहे. 'वंदे भारत एक्सप्रेस' ही याच नवीन भारताच्या संकल्प अन् क्षमतेचे प्रतीक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍यक्‍त केले. सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "सणासुदीच्या वातावरणात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला आज एक भव्य भेट मिळत आहे. आज 'वंदे भारत एक्सप्रेस' ही एकप्रकारे या दोन्ही राज्यातील सामाजिक वारसा जोडणार आहे. यासाठी मी या दोन्ही राज्यातील जनतेचे अभिनंदन करतो. 'वंदे भारत एक्सप्रेस' ही देशाची ट्रेन आहे, कारण ही पूर्णपणे भारतात आणि भारतीयांनीच बनवलेली आहे. गेल्या काही वर्षात 'वंदे भारत एक्सप्रेस' ने एकूण २३ लाख किलोमीटरचे अंतर कापले आहे. आतापर्यंत या गाड्यांमधून ४० लाखांहून अधिक जणांनी प्रवास केला आहे."

वंदे भारत एक्सप्रेस आत्मनिर्भरते'कडे वाटचाल करणाऱ्या भारताचे प्रतीक

वंदे भारत एक्स्प्रेस हे अशा भारताचे प्रतीक आहे, ज्याला आपल्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवायच्या आहेत. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल करणाऱ्या भारताचे प्रतीक म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आज लष्कर दिन आहे. या दिवसाबद्दल प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याचा अभिमान असला पाहिजे. देशाच्या संरक्षणात भारतीय लष्कराचे योगदान आणि शौर्य अतुलनीय आहे. मी आपले सर्व सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करत असल्याचेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले.

SCROLL FOR NEXT