Latest

Vajramuth Sabha : ‘शिवसेनेमुळे मुंबईत मराठी माणूस’, अजितदादांचा ठाकरेंवर कौतुकांचा वर्षाव

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीकेसीतील वज्रमुठ सभेत बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या कामावर ताशेरे ओढले. त्याचबरोबर शिवसेना-ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

शिवसेनेमुळे मुंबईत मराठी माणूस कायम आहे. बाळासाहेबांते मुंबईसाठी मोठं योगदान आहे. कोरोनाच्या काळात आम्ही आर्थिक स्थेर्य ठेवले होते. राज्यात गुंडगिरी वाढली आहे, कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. असं अजित पवार यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सध्यपरिस्थितीवर सत्ताधारी गटाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कोर्टाने राज्य सरकारला नपंसक म्हटलं आहे. कोर्टाच्या ताशेऱ्यांची सरकारला लाज वाटली नाही. हे राज्य सरकार घटनाबाह्य पद्धतीने स्थापन झालेले आहे. भाषणामध्ये शिंदेची अनेकदा भांबेरी, अनेकदा चुका झालेल्या पहायला मिळतात. महाराष्ट्रातल्या सत्ताधारी गटाचा मीडिया कारभार दाखवू शकत नाही असा चालू आहे अशी टीका पवार यांनी केली.

आताच्या दहा महिन्याच्या सरकारच्या काळातील जाहिरातींवरच्या खर्चाचा विचार करा. हा जनतेचा पैसा आहे. कोणीही उठतो आणि कोणत्याही विषयावर बोलतो. अलिकडच्या काळात न विचारताच बातम्या दिल्या जातात. मात्र यावर विश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही. 'पर्यटन विभागाची एक जाहिरात आहे, देखो आपला महाराष्ट्र'. मराठी मध्ये पहा असं न म्हणता, देखो का म्हणायचं? ही मराठी जाहिरात आहे का असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT