Latest

Devendra Fadnavis : वडेट्टीवार यांनी आपले पद, पक्ष सांभाळावा : देवेंद्र फडणवीस

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने आरोप केलेल्या 9 मंत्र्यांना काढावेच लागेल असे वक्तव्य केले यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी आमची चिंता करू नये, आपले पद आणि आपला पक्ष सांभाळावा असा पलटवार केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आज अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आले आहेत. यानिमित्ताने फडणवीस माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांच्या बाबतीत देखील मी बोलावे इतके ते मोठे नसल्याचे सांगितले. फडणवीस मदारी आणि दोघे त्यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याची टीका त्यांनी केली होती. कदाचित राऊत त्यांच्या पार्टीतले सांगत असतील की कोण मदारी आहे आणि कोण माकड आहे हे सर्व जनतेला ठाऊक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एशियन गेम्सच्या यशाबाबत फडणवीस म्हणाले,अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एशियन गेम्स मध्ये १०० पदके पार करण्याचा विक्रम झाला आहे. १०० हून जास्त मेडल्स भारताला मिळाली आहेत, केवळ गोल्ड मेडल्स २५ च्या वर गेली आहेत.

ओजस देवतळेने नागपूरसह महाराष्ट्र व भारताचे नाव मोठे केले आहे आणि आम्ही त्याला यापूर्वीच शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रमधील भारताच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. संजय शिरसाठ यांनी फडणवीस यांनी केंद्रात जावे शिंदे-अजितदादा महाराष्ट्र सांभाळतील असे वक्तव्य केले याकडे लक्ष वेधले असता शिरसाठ यांच्या शुभेच्छा मला मान्य आहेत असे सूचक वक्तव्य केले.

दरम्यान, नक्षलवाद बिमोड संदर्भात पुढील दोन वर्षाचा प्लान बनवलेला आहे. काही जिल्ह्यामधील नक्षलवादावर नियंत्रण मिळवले आहे. नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण होऊन मुळ प्रवाहात कसे येतील हा प्रयत्न आहे. जे येत नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT