Latest

‘लसीकरणामुळे वाचले कोट्यवधी लोकांचे जीव’ द लान्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नलचा दावा

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा जीव गेला. भारतात देखील ५ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशात कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण अभियान राबवण्यात आले आहे. या लसीकरणामुळेच कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले आहे. 'द लान्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नल' मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार भारतात २०२१ मध्ये लसीकरणामुळे ४२ लाख लोकांचे प्राण वाचल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोबतच जगभरात लसीकरणामुळे दोन कोटी लोकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे देखील अहवालातून सांगण्यात आले आहे. १८५ हून अधिक देशांतील मृत्यूच्या आकडेवारीच्या आधारावर हा अनुमान काढण्यात आला आहे. ही आकडेवारी डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत घेण्यात आली आहे. अभ्यासानुसार डब्ल्यूएचओचे लक्ष २०२१ पर्यंत पूर्ण केले असते, तर ५ लाख ९९ हजार ३०० लोकांचे प्राण वाचवले जावू शकले असते. २०२१ च्या अखेरपर्यंत प्रत्येक देशात ४० टक्के लोकसंख्येला किमान दोन अथवा दोन हून अधिक लस लावण्याचे लक्ष डब्ल्यूएचओकडून देण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT