पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : अण्णा द्रमुकमधून गतवर्षी हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ नेते व्ही. मैत्रेयन यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगत अ. द्रमुकचे सरचिटणीस ई. पलानिस्वामी यांनी गतवर्षीच्या आॅक्टोबर महिन्यात मैत्रेयन यांची हकालपट्टी केली होती. मैत्रेयन हे ओ. पनीरसेल्वम गटाचे नेते म्हणून ओळखले जात होते. (V. Maitreyan)
भाजप मुख्यालयात सरचिटणीस अरुण सिंग यांच्या उपसि्थतीत मैत्रेयन यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देण्यात आले. मैत्रेयन हे नव्वदच्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाले. 1995 ते 1997 या कालावधीत ते तामिळनाडू भाजपचे सरचिटणीस होते तर 1999 ते 2000 या काळात प्रदेशाध्यक्ष होते. 2000 साली भाजपला रामराम करीत त्यांनी अ. द्रमुकमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 23 वर्षे ते अ. द्रमुकमध्ये सक्रिय होते.
हेही वाचा