Latest

Uttarkashi tunnel rescue | उत्तरकाशी- बचावकार्यात अडथळे, मुख्यमंत्री धामी यांचा बोगद्याच्या ठिकाणी रात्रभर मुक्काम

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी आज शुक्रवारी (दि.२४) १३ व्या दिवशीही बचावकार्य सुरु आहे. आज संध्याकाळपर्यंत कामगारांची सुटका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकन ऑगर मशिनचा वापर करून सिल्क्यारा बोगद्याच्या बाजूने खोदकाम सुरू असताना बचाव पथकाला गुरुवारी रात्री उशिरा आणखी एका तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. आतापर्यंत बचाव पथकाने ४६.८ मीटरपर्यंत ड्रिलिंग केले आहे आणि बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ९ मीटर बाकी आहेत. (Uttarkashi tunnel rescue)

संबंधित बातम्या 

दरम्यान, पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले की, "आम्हाला आशा आहे की आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांची (कामगारांची) सुटका करू शकू."

त्यांनी पुढे बोलताना म्हटले, "आता परिस्थिती खूप चांगली आहे. काल रात्री आम्हाला दोन गोष्टींवर काम करायचे होते. पहिली म्हणजे आम्हाला मशीनच्या प्लॅटफॉर्मची दुरुस्ती करायची होती. पार्सन्स कंपनीने ग्राउंड पेनिट्रेशन रडारचे काम केले होते. ज्याद्वारे आम्हाला कळले की पुढील ५ मीटरपर्यंत कोणताही अडथळा नाही. याचा अर्थ असा की ड्रिलिंग सुरळीत व्हायला हवे. आम्ही जेव्हा ढिगारा बाहेर काढत होतो तेव्हा आम्हाला दोन खराब झालेल्या पाईप्स मिळाल्या…"

आम्ही आशा करतो की सकाळी ११-११.३० पर्यंत ड्रिलिंग सुरू करू. ग्राउंड पेनिट्रेशन रडारच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की पुढील ५ मीटरमध्ये कोणत्याही धातूचा अडथळा नाही.

मुख्यमंत्री धामी यांचे मातली येथे कॅम्प ऑफिस

दरम्यान, 'इंडिया टुडे'ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी बोगद्याच्या ठिकाणी रात्रभर थांबले होते. ते नंतर राजधानी डेहराडूनला परततील. धामी यांनी गुरुवारी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की ते बुधवारी संध्याकाळपासून उत्तरकाशीमध्ये सिल्क्यारा बोगद्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. बचाव कार्यादरम्यान सरकारी कामावर परिणाम होऊ नये, यासाठी मातली येथे मुख्यमंत्र्यांचे तात्पुरते कॅम्प ऑफिस स्थापन करण्यात आले आहे. त्यांनी काल बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी ऑडिओ कम्युनिकेशनद्वारे संवाद साधत त्यांना धीर दिला होता. (Uttarkashi tunnel rescue)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT