Latest

राणीच्या अंत्यसंस्कारविधीमध्ये ज्यो बायडेन राहणार उपस्थित, पंतप्रधान मोदींचा असू शकतो हा निर्णय

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं नुकतंच निधन झालं आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी राणीच्या अंतिमसंस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे. राणीच्या अंतिमसंस्कार सोहळ्याच्या तारखेची अधिकृत घोषणा झाली नसली तरी १९ सप्टेंबर या तारखेची चर्चा सर्वत्र सुरु असल्याचं बोललं जात आहे. अर्थात अंतिमसंस्कार सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या नावांची चर्चा मात्र सर्वत्र सुरु आहे. युरोपातील इतर राजघराणी, अनेक राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान या सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
जवळपास ७० वर्षांच्या शासनकाळानंतर स्कॉटलंडमध्ये राणीने शेवटचा श्वास घेतला होता.

राणीच्या निधनानंतर ब्रिटनचे नवीन सम्राट म्हणून प्रिन्स चार्ल्स आज पदग्रहण करणार असल्याचं बोललं जात आहे. राणीच्या अंतिम संस्कार सोहळ्याला पंत्प्रधान मोदी उपस्थिती लावणार का याचीही चारचा जोर धरू लागली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अजून यासंदर्भात कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान राणीच्या निधनानंतर जाहीर केलेल्या शोक संदेशात पंतप्रधान मोदींनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. २०२५ आणि २०१८ मध्ये त्यांनी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. आपल्या संदेशात ते म्हणतात, 'त्याचा मृदू आणि दयाळू स्वभाव विसरणं अशक्य आहे. आमच्या भेटी दरम्यान त्यांनी मला महात्मा गांधी यांनी त्यांच्या लग्नात भेट दिलेला रुमाल दाखवला. मला त्यांच्या या भावनांविषयी आदर वाटतो. उत्तम नेतृत्वाचा एक आलेख एलिझाबेथ यांनी घालून दिला. सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर हा आदर्श ठरेल असाच होता. या दु;खद प्रसंगी राणीच्या कुटुंबियांसोबत आणि देशवासियांसोबत माझ्या संवेदनाआहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT