Latest

Urfi Javed : ऊर्फी झाली ट्रोल; तू तुझा विचार कर !…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : 'बिग बॉस १६'चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॅपर एमसी स्टॅन खूपच चर्चेत आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेने शाहरूख खान आणि विराट कोहली यांनाही मागे टाकले आहे. स्टॅनच्या इन्स्टाग्रामला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. त्याची फॅन फॉलोइंग पाहून अभिनेत्री ऊर्फी जावेदनेसुद्धा त्याचे कौतुक केले होते; मात्र ऊर्फीने ( Urfi Javed )  स्टॅनबद्दल केलेल्या कमेंटनंतर नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

स्टॅन तर मला खूप आवडतो यार, मी त्याच्यावर प्रेम करते. जेव्हा कधी मला कोणी विचारले की कोण जिंकणार, मी नेहमीच त्याचे नाव घेत असे. मला त्याची शेमडीसुद्धा खूप आवडते, असे ऊर्फी ( Urfi Javed ) म्हणाली. 'बिग बॉस'च्या घरात एमसी स्टॅन नेहमी अर्चना गौतमला शेमडी म्हणून हाक मारायचा. तिचाच उल्लेख ऊर्फीने केला. ऊर्फीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तो आधीपासूनच लोकप्रिय आहे, तू तुझा विचार कर, असे एकाने म्हटले आहे, तर तुझ्यासारख्या लोकांनाच तो शेमडी म्हणतो, अशी टीका दुसऱ्या युजरने केली.

SCROLL FOR NEXT