पुढारी ऑनलाईन डेस्क : Urfi Javed vs Hindustani Bhau : सोशल मीडिया क्वीन आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत ट्रोल होत असते. ती ज्या प्रकारचे कपडे परिधान करते त्यावर सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. बहुतेक लोक उर्फीची खिल्ली उडवताना दिसतात. कपड्यांमुळे तिला अश्लील कमेंटलाही सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊने (Hindustani Bhau) उर्फी जावेदला एक व्हिडिओ शेअर करून धमकी दिली होती, पण उर्फीनेही त्याच्याच शैलीत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. चला तर जाणून घेऊया नेमके काय घडले ते…
उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांबाबत हिंदुस्थानी भाऊने (Hindustani Bhau) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, 'सुधर उर्फी.. जय हिंद! हा मॅसेज उर्फी जावेदसाठी आहे, जी आजच्या काळात स्वतःला खूप मोठी फॅशन डिझायनर समजत आहे. फॅशनच्या नावाखाली ती परिधान करत असलेल्या कपड्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. ही भारताची संस्कृती नाही. सुधर उर्फी.
हिंदुस्थानी भाऊचा (Hindustani Bhau) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने उर्फी जावेदला (Urfi Javed) धमकी देत म्हटलंय की, 'तू असं करणं थांबवले नाहीस तर मी तुला ठीक करीन.' आता हा संपूर्ण व्हिडिओ उर्फी जावेदने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या धमकीच्या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, 'पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाला घाबरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुस्थानी भाऊ हे दुतोंडी माणूस आहेत. त्याने सांगितले की, एकदा त्याला हिंदुस्थानी भाऊच्या टीमने मदत देऊ केली होती. मात्र त्याने ही मदत घेण्यास नकार दिल्याने हे लोक त्याच्या मागे लागले आहेत.
एकदा मला हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) टीमने मदत देऊ केली होती. मात्र मी ही मदत घेण्यास नकार दिल्याने हे लोक माझ्या मागे लागले आहेत. तुला माहित आहे की मी तुला तुरुंगात पाठवू शकते, पण मी तसे करू शकत नाही कारण तू अनेकदा तुरुंगात गेला आहेस. आपल्या निम्म्या वयाच्या मुलीला खुलेआम धमकावून तुरुंगात जाणे हा देशातील तरुणांसाठी चांगला संदेश आहे, असा खोचक टोला तिने हिंदुस्थानी भाऊला लगावला आहे. (Urfi Javed vs Hindustani Bhau)