Latest

UPSC Prelims : ‘यूपीएससी’ची प्रिलिम्स पुढे ढकलली; जाणून घ्या नवीन तारीख

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी (दि.२०) लोकसभा निवडणुकीमुळे २६ मे रोजी होणारी प्रिलिम्स परीक्षा १६ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर अधिकारी निवडण्यासाठी युपीएससी दरवर्षी तीन टप्प्यात नागरी सेवा परीक्षा आयोजित करते.

युपीएससीने सांगितले की, 'आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक पाहता, आयोगाने प्रिलिम्स परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.' परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाइन जारी केले जातील. निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्व परीक्षा १६ जूनला होणार असून मुख्य परीक्षा २० सप्टेंबरपासून पाच दिवस चालणार आहे.

यापूर्वी, आयोगाने नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील वाढवली होती. अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च पर्यंत वाढवण्यात आली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT