Latest

‘लाल डायरी’वरुन राजस्‍थान विधानसभेत प्रचंड गदारोळ, बडतर्फ मंत्री गुढा धाय मोकलून रडले!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभेत माजी मंत्री राजेंद्र गुढा यांच्‍या लाल डायरीचा वाद चांगला गाजला. विधानसभा अध्‍यक्षांच्‍या सूचनेनंतर मार्शल्‍सनी बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांना सभागृहाबाहेर काढले. यावेळी झालेल्‍या प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले. यानंतर माध्‍यमांशी बोलताना गुढा यांनी धाय मोकलून रडत आपली बाजू मांडली.

विधानसभेत प्रचंड गदारोळ

राजस्थानमधील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर काही तासांतच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुढा यांची हकालपट्टी करण्‍यात आली होती. आपल्याच सरकारला धारेवर धरण्‍यासाठी लाल डायरी घेवून राजेंद्र गुढा आज विधानसभेत आले. विधानसभेत प्रवेश करताना त्‍यांची काँग्रेस आमदारांनी अडवणूक केली. काही वेळानंतर ते सभागृहात गेले. सभागृहात जाताच  सभापती डॉ.सी.पी.जोशी यांच्या आसनासमोरील वेलमध्ये पोहोचले. डायरी हलवत गुड्डा म्हणाला की, सभागृहात मला बोलू दिले पाहिजे. यावर विधानसभेचे अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी यांनी त्यांना वारंवार 'माझ्या चेंबरमध्ये या' असे सांगत त्यांना येथे सभागृहात बोलू दिले जाणार नाही, तुम्ही मला हुकूम देऊ शकत नाही, असे स्‍पष्‍ट केले. तुम्‍हाला सभागृहात दादागिरी करायची का? असा सवालही त्‍यांनी केला. अखेर गुढा आपल्‍याच भूमिकेवर ठाम राहिले. यानंतर विधानसभा अध्‍यक्षांच्‍या सूचनेनंतर मार्शल्‍सनी बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांना सभागृहाबाहेर काढले. यावेळी झालेल्‍या प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले.

लाल डायरीत नेमकं काय?

माझ्‍याकडे असणार्‍या लाल  डायरीमध्‍ये राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत यांच्‍या बेकायदा आर्थिक व्‍यवहारांची माहिती असल्‍याचा दावाही माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी यावेळी केला.

माध्‍यमांशी बोलताना गुढा धाय मोकलून रडले!

विधानसभेत गदारोळानंतर माध्‍यमांशी बोलताना माजी मंत्री गुढा यांना अश्रू अनावर झाले. ते म्‍हणाले, "मला माझी लाल डायरी अध्यक्षांना दाखवायची होती; पण त्यांनी मला बोलू दिले नाही. काँग्रेस नेते शांती कुमार धारिवाल यांनी मला धक्काबुक्की करून डायरीची काही पाने काढून घेतली. काही काँग्रेस नेत्यांनी मला लाथ मारून धक्काबुक्की केली आणि नंतर विधानसभेतून हाकलून दिले, असे सांगताना त्‍यांना अश्रू अनावरण झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT