Latest

देशात अवकाळी पावसाचे संकट तीव्र; ११ राज्यांतून गारपिटीचाही इशारा

दिनेश चोरगे

नवी दिल्ली/कुलाबा; वृत्तसंस्था :  देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनची चाहूल लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 3 मेपर्यंत हीच स्थिती राहील, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
4 मेपासून उघडीप मिळेल, असेही या खात्याने म्हटले आहे.

गेल्या 36 तासांत या राज्यांतील अनेक भागांत थंडी वाढली आहे. पुण्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा पारा खाली येणार आहे. भोपाळमध्ये भर दुपारी थंडी वाजत होती. रविवारी दुपारी अडीच वाजता या शहरातील तापमान 18.6 अंशांवर गेले होते. सोमवारीही फारसा फरक पडलेला नाही. राजस्थानमध्येही हीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह दिल्ली, पंजाबमध्येही तापमानात 3 ते
5 अंशांनी घट झाली आहे.

पुण्यात तापमानाचा पारा खाली

पुणे, दिल्ली, भोपाळ, जबलपूर, डेहराडून, भीलवाडा, जालंधर, बरेली, गया, हरदोई आणि कोहिमात मंगळवारी, बुधवारी किमान तापमान 20 अंश सेल्सिअसहून कमी असेल. छत्रपती संभाजीनगरसह नांदेडलाही अवकाळी पाऊस पडला. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातही ठिकठिकाणी हलका पाऊस झाला.

हरियाणात आज ऑरेंज अलर्ट

हरियाणामध्ये पुढील 3 दिवस संततधार पाऊस, वादळ आणि गारपीट सुरू राहील. मंगळवारसाठी या राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे.

SCROLL FOR NEXT