Latest

Sexual Assault Case : बर्थ डे पार्टीमध्ये विद्यार्थिनीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शाळेतील मित्राच्या बर्थ डे पार्टीला गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या मित्राने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तो मित्र एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने या अत्याचाराचा व्हिडिओ शूट केला. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर तीन वर्षांनी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून कफपरेड पोलिसांनी मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुलाबा येथील रहिवासी असलेली पीडित विद्यार्थिनी सध्या शिक्षणासाठी लंडनमध्ये वास्तव्यास आहे. २०२० मध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती मुंबईत आजी-आजोबांकडे राहण्यास होती. २८ फेब्रुवारी २०२० रोजी शाळेतील मित्राचा वाढदिवस असल्याने पीडित तरुणीसह काही मित्र त्याच्या घरी पार्टीसाठी गेले होते. बर्थ डे पार्टीत सर्वांनी मद्यपान केले. याच, दरम्यान एका मित्राने नशेत बाथरूममध्ये गेलेल्या या विद्यार्थिनीशी जवळीक साधत अनैसर्गिक संबंध ठेवले.

विद्यार्थिनीच्या नकळत त्याने या कृत्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ त्याने स्नॅपचॅट या सोशल मीडिया अॅपवर व्हायरल केल्यानंतर विद्यार्थिनीला धक्का बसला. तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT