Latest

अवतार 2 मध्ये सर्व दृश्यांचे चित्रिकरण पाण्याखाली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

जेम्म कॅमेरून दिग्दर्शित अवतार चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान आहे. आतापर्यंतच्या अनेक हॉलिवूडपटांमध्ये अंतराळातून आलेले एलियन्स विरूद्ध पृथ्वीवरील सजीव असा संघर्ष दिसला होता. अवतार असा पहिला चित्रपट असावा ज्यात पृथ्वीवरील सजीव पँडोरा गृहावरील सजीवांसाठी एलियन्स ठरले होते. असे कथानक, मांडणी, सादरीकरण, स्पेशल इफेक्ट्स मुळे हा चित्रपट आजही अनेकांच्या ऑलटाईम फेव्हरिट चित्रपटांच्या यादीत असतो. या चित्रपटाच्या पुढील पोस्टरबाबतही वारंवार चर्चा होत असते. तर आता या चित्रपटांच्या पुढील भागांच्या प्री प्रॉडक्शनवर तब्बल एक दशक काम केल्यानंतर जेम्स कॅमेरून अवतारचा दुसरा भाग घेऊन येत आहे.

कॅमेरून यांनी अवतार 2 च्या शूटिंगची काही छायाचित्रे सोशल मीडियातून शेअर केली आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व दृश्ये पाण्याखाली चित्रित झाली आहेत. कॅमेरून यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांतूनही ते दिसते.

हा चित्रपट बरोबर एक वर्षाने म्हणजे पुढील वर्षी 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सप्टेंबर 2020 मध्ये अवतार 2 चे चित्रीकरण संपले आहे. अवतार 3 चे चित्रिकरणही जवळपास संपल्याची माहिती आहे. अवतार 3 हा 20 डिसेंबर 2024 रोजी रीलीज करण्यात येणार आहे, अवतार 4 डिसेंबर 2026 मध्ये तर अवतार 5 डिसेंबर 2028 मध्ये रीलीज करण्याचे नियोजन आहे.

जगात सर्वाधिक कमाईचा विक्रम

जेम्स कॅमेरूनने यापूर्वी टर्मिनेटर, टायटॅनिक आणि अवतार या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 2012 मध्ये अवतार आला होता आणि या चित्रपटाने जगभरातील कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. या चित्रपटाचा सर्वाधिक कमाईचा विक्रम अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेमने मोडला होता. पण चीनमध्ये अलीकडच्या काळात अवतार पुन्हा रीलीज केल्यानंतर हा विक्रम अवतारने पुन्हा स्वतःच्या नावे केले आहे. अवतारचे बजेट सुमारे 1800 कोटी रूपये होते आणि जगभरातून आतापर्यंत या चित्रपटाने 20,800 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

तब्बल 7600 कोटी रूपये बजेट

महत्वाचे म्हणजे केवळ अवतार 2 चं नाही तर अवतार 3, अवतार 4 आणि अवतार 5 साठीही काम सुरू झाले आहे. अवतारच्या या सीक्वेल्सचे बजेट 1 बिलियन डॉलर म्हणजेच 7600 कोटी रूपये इतके मोठे आहे. म्हणजेच प्रत्येक चित्रपटावर किमान 250 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1900 कोटी रूपये इतके असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT