Latest

मुलाचा एन्‍काऊंटर झाल्‍याचे समजताच माफिया अतीक अहमद न्‍यायालयातच धाय माकलून रडला!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज न्‍यायालयाने आज ( दि. १३ ) फिल्‍मी स्‍टाईल प्रसंग अनुभवला. बहुचर्चित उमेश पाल हत्‍या प्रकरणी न्‍यायालयाने अतीक अहमद याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याचवेळी न्‍यायालयात अतीकला याला मुलगा असद हा चकमकीत ठार झाल्‍याची माहिती देण्‍यात आली. ही माहिती मिळताच न्‍यायालयातच अतीक अहमद धाय माकलून रडू लागला. त्‍याने स्‍वत:वरील नियंत्रण गमावले. तो थेट जमिनीवरच बसला. याचवेळी योगी आदित्‍यनाथ जिंदाबाद अशा घोषणा न्‍यायालया बाहेरील परिसर दणाणून गेला.

अतीक अहमदला १४ दिवसांच्‍या कोठडी, जमावातून बूट फेक

उमेश पाल हत्‍या प्रकरणातील आरोपी अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अशरफ याला प्रयागराज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. यासाठी दोघांना साबरमती कारागृहातून प्रयागराज न्यायालयात आणण्यात आले होते. न्‍यायालयाने अतीक अहमद आणि अशरफ या दोघांना  १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्‍यायालयाबाहेर अतीक विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. न्‍यायाधीशांनी तत्‍काळ दोन्‍ही आरोपींना हलविण्‍यास सांगितले. प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्‍तात आरोपींना न्‍यायालयाबाहेर नेण्‍यात आले. यावेळी जमावातील एकाने अतीकवर बूट फेकून मारला.  त्‍याला तो लागला नाही. पोलिसांनी दोन्‍ही आरोपींना तत्‍काळ परिसरातून बाहेर काढले.

 मुलगा चकमकीत ठार झाल्‍याचे समजताच…

न्‍यायालयात अतीकला याला मुलगा असद हा चकमकीत ठार झाल्‍याची माहिती देण्‍यात आली. ही माहिती मिळताच न्‍यायालयातच अतीक अहमद धाय माकलून रडू लागला. त्‍याने स्‍वत:वरील नियंत्रण गमावले. तो थेट जमिनीवरच बसला. काही वेळानंतर पोलिसांनी त्‍याला न्‍यायालयाबाहेर नेले.

न्‍यायालयात सुनावणी सुरु असतानाच चकमकीचे बातमी आली समोर

प्रयागराज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेश पाल यांची हत्‍या झाली होती. तेव्‍हापासून असद आणि शूटर गुलाम मोहम्मद हे फरार झाले होते. उत्तर प्रदेश पोलिसाचे विशेष कृती दल ( एसटीएफ ) या दोघांच्‍या मागावर होती. पथकाला दोघेही झाशी येथे असल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती.  पोलिसांनी त्‍यानुसार सापळा लावला. पोलिसांनी दोघांना शरण येण्‍याचे आवाहन केले. यावेळी दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात दोघेही ठार झाले. दरम्‍यान,  प्रयागराज न्‍यायालयात अतिकची सुनावणी सुरु असतानाच चकमकीचे बातमी आली समोर आल्‍याने उत्तर प्रदेशमध्‍ये मोठी खळबळ माजली.

उत्तर प्रदेश 'एसटीएफ'ची झाशी येथे धडक कारवाई

उत्तर प्रदेशमधील झाशी येथे 'एसटीएफ'i; पोलीस अधीक्षक नवेंदू आणि पोलीस उपअधीक्षक विमल यांच्या नेतृत्वाखालील पथकाबरोबर झालेल्‍या चकमकीत असद आणि गुलाम मोहम्‍मद ठार झाले. या दोघांकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्‍यात आल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

असद होता दीड महिन्‍यांपासून फरार, दिल्‍ली पोलिसांना दिला होता गुंगारा

उमेश पाल हत्‍येनंतर असद अहमद हा दीड महिन्यांपासून फरार होता. तो नेहमी स्‍वत:कडे तीन ते चार शस्त्रे बाळगत असे. तसेच झोपेत असतानाही तो शस्त्र सोबत ठेवायचा. दिल्ली पोलिसांचे विशेष पथकही त्‍याच्‍या मागावर होते. मात्र दिल्‍ली पोलिसांच्‍या विशेष पथक संगम विहारमध्ये पोहोचली. यापूर्वी असद गुलामसोबत फरार झाला होता. स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माफिया डॉन अतिक अहमदचा माजी ड्रायव्हर शफीक याने असदच्या दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली होती. त्याने असदला त्याच्या ओळखीच्या झीशान, खालिद आणि जावेद यांच्याकडे दिल्लीला पाठवले होते. शफीकच्या सांगण्यावरून असदला आपल्या घरात आश्रय दिल्याचे या मदतनीसांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले होते. असद तिघांच्याही घरी राहायचा आणि दोन दिवसांनी घर बदलायचा. संगम विहार येथे मुक्कामादरम्यान आरोपींना शेजाऱ्यांपैकी कोणीही ओळखले नाही.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, माफिया डॉनचा मुलगा आणि शूटर असद हा दिल्लीत १५ दिवसांच्या आश्रयादरम्यान या आरोपींच्या घरी थांबले होते. कधी-कधी ते संगम विहारातच फिरायला जायचे. दोन्ही आरोपी संगम विहारच्या बाहेर फिरायला गेले नाहीत. उमेश पालचा खून झाल्यानंतरच हे दोघेही दिल्लीत आले होते. यावेळी असदने त्याचा मोबाईल फोन वापरला नाही. तो उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी साथीदारांच्‍या फोनवरून बोलत असे.

SCROLL FOR NEXT