Latest

Volodymyr Zelensky : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट उधळला, पुतिन समर्थक दोन यूक्रेनी अधिका-यांना अटक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट हाणून पाडला असून याप्रकरणी दोन युक्रेनियन सुरक्षा अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिस (एसबीयू)ने मंगळवारी (दि. 7) याबाबत माहिती दिली.

एसबीयुने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि इतर वरिष्ठ युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या हत्येच्या कट रचण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ते पुतिन समर्थक आहेत. हे दोघे युक्रेनियन सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होते. पण ते रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी)चे एजंट्सच्या नेटवर्कचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे टार्गेट झेलेन्स्की यांच्या सुरक्षा रक्षकाच्या पथकाचा भाग होणे आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांची हत्या करणे हे होते. पण हा कट युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिसला (एसबीयू) उधळून लावण्यात यश आले आहे.'

अटक करण्यात आलेले आरोपी हे फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी भरती झाले होते. त्यांनी इस्टर सणापूर्वी लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख बुडानोव्ह यांना ठार मारण्याची योजना आखली होती. आरोपी लष्करप्रमुखांची ड्रोन आणि रॉकेटने हत्या करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी त्यांची खरेदीही केली होती. पुतिन यांना त्यांच्या शपथविधीपूर्वी एक मोठी भेट देण्याचा त्यांचा उद्देश होता, अशी माहिती चौकशीतून पुढे आली, असे एसबीयूचे प्रमुख वासिल मल्युक यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT