Latest

अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य : उद्धव ठाकरे

निलेश पोतदार

भोकर, पुढारी वृत्तसेवा गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्रचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता. पण मोठी माणसं गद्दार झाली तरी जनता मात्र गद्दार होत नाही. यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. त्यांनी रस्ते अडवले होते, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोकर येथील पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडीचे नांदेडमधील उमदेवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (दि.२४) नांदेड जिल्हा दौ-यावर आले होते. भोकरमधील तलाव रिसार्ट येथे त्‍यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, माधवराव पाटील शेळगावकर, डॉ सुनील कदम, गोविंद पाटील गौड, बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रकाश देशमुख, सुभाष पाटील किन्हाळकर, माधवराव वडगावकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, कारण भाजपाची मागील दहा वर्षाची वाटचाल याच दिशेने चालू आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर असून गद्दारांच्या सुरेक्षेत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचे नाव कोरले असल्याने आता सातबाऱ्यावरील आपले नाव उडवील म्हणून शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. महाविकास आघाडी मधील सर्व पक्षातील कार्यकर्ते जीव लावून काम करत असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. एकनाथ शिंदें बाबत प्रश्न विचारले असता घटनाबाह्य लोकावर मी बोलत नाही, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT