Latest

उद्धव ठाकरेही मोदींची तारीफ करतील : बावनकुळे 

backup backup
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना श्री बानवकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना १५० देशांनी नेता म्हणून मान्यता दिली. जी-२० च्या आयोजनातून भारताची शक्ती जगाला कळली. चीनमधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून मोदीची प्रशंसा केली जात आहे. पाकिस्तान वगळता सर्वच देश मोदींची स्तुती करीत आहे. अशा वेळी पाकिस्थान आणि उद्धव ठाकरे हेच मोदींच्या कामाने आनंदी नाहीत. परंतु एक दिवस असा येईल ज्या दिवशी उद्धव ठाकरेही मोदींची स्तुती करतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विकास म्हणजे काय हे कळण्यासाठी आणि टीका करण्यापूर्वी त्यांनी मुंबईत झालेला अटल सेतू उद्घाटनाचा कार्यक्रम पहायला हवा होता.
उद्वव ठाकरे व शरद पवार यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या पक्षाची अवस्था गंभीर आहे. दोन्ही शिल्लक गटांना उमेदवार मिळत नसल्याने ही जागा याला सोड, ती जागा त्याला सोड अशी भूमिका घेत आहे. येत्या काळात मविआच्या घटक पक्षातून मोठे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट महायुतीच्या घटक पक्षात होतील. त्यामुळे त्यांना उमेदवारही मिळणार नाही.

बाळासाहेबांची स्वप्नांची पूर्ती होतेय

प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत साकारत पूर्णत्वास जात असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नांची पूर्तताही होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाच्या वेळी काय करीत होते, असाही प्रश्न त्यांनी केला. ज्यांना अयोध्येला जाण्याचे निमंत्रण मिळाले आहे, त्यांनी अयोध्येला जावे. असे न करणारे हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत असे टीकास्त्र बावनकुळे यांनी सोडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT