Latest

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य : उद्धव ठाकरे

अनुराधा कोरवी

भोकर ः पुढारी वृत्तसेवा ;  गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता; पण मोठी माणसे गद्दार झाली. जनता मात्र गद्दार होत नाही. यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. त्यांनी रस्ते अडवले होते, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोकर येथे केली.

महाविकास आघाडीचे नांदेडमधील उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे नांदेड जिल्हा दौर्‍यावर आले होते. भोकरमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारण, भाजपची वाटचाल याच दिशेने चालू आहे. सामान्यांची सुरक्षा वार्‍यावर असून, गद्दारांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे.

शिवसेनेच्या सातबारावर गद्दारांचे नाव कोरले असल्याने ते आता सात-बारावरील आपले नाव उडवतील या भीतीने शेतकर्‍यांत भीती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारले असता घटनाबाह्य लोकांवर मी बोलत नाही, असे ठाकरे म्हणाले.

SCROLL FOR NEXT