Latest

Lok Sabha elections 2024 : सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही : उद्धव ठाकरे

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सांगली मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याने स्थानिक नेत्यांकडून मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, सांगलीमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आता वेळ न दवडता ठरल्याप्रमाणे काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. (Lok Sabha elections 2024)

सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, कारण मैत्रीपूर्ण लढतीला काहीही अर्थ नसतो. जेव्हा मैत्री असते तेव्हा तेथे लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते, असे सांगतानाच तसे झाले तर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचा घात होईल, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला. (Lok Sabha elections 2024)

विश्वजित कदम भूमिकेवर ठाम

सांगलीच्या जागेसाठी आमदार विश्वजित कदम यांच्यासह सांगली जिल्हा काँग्रेस आक्रमक आहे. तसेच जोपर्यंत सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्य प्रचार समिती आणि पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार असेल, असे पत्र विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे. कदम यांनी बुधवारी प्रचार समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. (Lok Sabha elections 2024)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT