Latest

कायद्याच्या पातळीवर मराठा आरक्षण टिकेल, अशी आशा : उद्धव ठाकरे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१८ ला काय झालं यावर मला बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद. टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल, अशी आशा आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. ते माध्यमांशी मराठा आरक्षणावर बोलत होते.

संबंधित बातम्या –

ठाकरे म्हणाले, आरक्षणाचा विषय शांततेत सोडवता आला असता. तातडीने मराठा समाजाला नोकऱ्या कुठे मिळतील, हे सरकारने जाहीर करावे. मुख्यमंत्री कसे आहेत, काय आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, हे सर्वजण जाणता. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर हमी दिली आहे. कायद्याच्या पातळीवर आरक्षण टीकेल, ही आशा आहे.

आज मला राजकारणावर बोलायचं नाही. पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. आरक्षणाबाबत कोणतेही दोन मते नाहीत. वेळासोबत वृत्तीही महत्त्वाची आहे. दिलेला शब्द पाळला अशी मुख्यमंत्र्याची ओळख असेल तर मला दिलेला शब्द जर पाळला असता तर त्यांना अशी फोडाफोडी करण्याची वेळ आली नसती. फडणवीसांनीही आरक्षण टिकेल, अशी गॅरंटी दिली होती, असेही त्यांनी नमूद केले.

SCROLL FOR NEXT