Latest

उदय कोटक यांनी एका दिवसात गमावले 10,800 कोटी रुपये

Arun Patil

मुंबई : नवीन क्रेडिट कार्ड वितरित करण्यास व डिजिटल मंचावर नवीन ग्राहक नोंदवण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्यावर अवघ्या एका दिवसात कोटक महिंद्रा बँकेचे चेअरमन उदय कोटक यांनी 10 हजार 800 कोटी रुपये गमावले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत बँकर अशी ओळख असलेल्या कोटक यांना हा मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेच्या विरोधात कारवाई केली. त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले.

कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 13 टक्क्यांनी गडगडले. या बँकेत उदय कोटक यांचे 26 टक्के शेअर्स आहेत. त्यांना त्याचा फटका सहन करावा लागला आहे. उदय कोटक यांची एप्रिल महिन्याच्या प्रारंभी एकूण संपत्ती 14.4 अब्ज डॉलर्स होती. तिच्यात 1.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 हजार 800 कोटी रुपयांची घट झाली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये पडझड झाल्याचा फायदा प्रतिस्पर्धी अ‍ॅक्सिस बँकेला झाला असून, 2016 नंतर प्रथमच अ‍ॅक्सिस बँकेचे बाजार भांडवल कोटक महिंद्रा बँकेपेक्षा अधिक झाले आहे.

SCROLL FOR NEXT