Latest

खेड: मोटारसायकल चोरी करणारे दोन चोर गुन्हे शोध पथकाने केले गजाआड

अमृता चौगुले

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: खेड पोलिसांनी राजगुरूनगर परिसरातील दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत केल्या. राजगुरूनगर येथील बालाजी आर्केड इमारतीच्या आवारातून दुचाकी चोरीस गेली होती. याबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी (दि. २४) पोलिस कर्मचारी सचिन जतकर, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे यांना गस्त घालत असताना धनश्री चौका जवळ दुचाकीवरुन दोघेजण संशयितरीत्या वावरताना दिसले. त्यावरून पोलिसांनी अभिजीत रामदास एरंडे (वय २५, रा. दस्तूरवाडी रोड, नाकेमळा, थुगाव, ता. आंबेगाव), आशुतोष अरूण एरंडे (वय २२, रा. थुगाव गावठाण) यांना ताब्यात घेतले. त्यांनी दुचाकी (एमएच१४ ईटी १८६१) बालाजी आर्केड या इमारतीच्या आवरातून चोरल्याची कबुली दिली.

या आरोपींकडून पोलिसांनी चोरीस गेलेल्या एकूण दुचाकी जप्त केल्या. पोलिस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस कर्मचारी संतोष घोलप, सचिन जतकर, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, योगेश भंडारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT