Latest

कोरगाव भीमा : एकाच ठिकाणी आढळले दोन वेग-वेगळ्या जातीचे अतिविषारी साप

अमृता चौगुले

कोरगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील यशराज प्रॉपर्टीज या ठिकाणी एकाच वेळी दोन भलेमोठे अतिविषारी साप आढळून आल्याने खळबळ उडाली. सर्पमित्रांच्या प्रयत्नाने या सापांना जीवदान देत निसर्गात मुक्त करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कोरेगाव भीमा येथील यशराज प्रॉपर्टीज येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन भलेमोठे साप असल्याचे योगेश वाडेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांना माहिती दिली. त्यांनतर सर्पमित्र शुभम वाघ यांनी तेथे पोहोचत पाहणी केली असता, पूर्ण वाढ झालेला नाग व घोणस असे दोन अतिविषारी साप दिसून आले. शुभम वाघ यांनी दोन्ही सापांना पकडले.

याप्रसंगी संदीप ढेरंगे, माणिक जायभाय, सोमनाथ हरिहर, भास्कर धनगर, नाना येडे आदी उपस्थित होते. दरम्यान, या सापांची माहिती शिरूर वनविभागाच्या वनपरिमंडळ अधिकारी व नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे यांना देत सर्पमित्र शेरखान शेख, शुभम वाघ, अमोल कुसाळकर यांनी दोन्ही अतिविषारी सापांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT