Latest

कारखान्यात जय-वीरूच्या नावाने होते प्रसिद्ध, एकाच दिवशी जिवलग मित्रांनी काही तासांच्या फरकाने सोडले प्राण

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर (बारामती), पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर साखर कारखान्यात काम करणारे रामचंद्र किसन कोरडे व त्यांचे जिवलग मित्र अशोक गणपत होळकर या दोघांचे हृदयविकाराने निधन झाले. कारखान्यात जय-वीरू या नावाने प्रसिद्ध असलेले कोरडे-होळकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रामचंद्र कोरडे (वय ४९) यांचे सोमवार १७ एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले, तर त्यांचे जिवलग मित्र अशोक होळकर यांचे त्याच दिवशी सायंकाळी हृदयविकारानेच निधन झाले आहे.

रामचंद्र कोरडे हे खंडोबाचीवाडी येथील रहिवासी असून, सोमेश्वर कारखान्यात कामाला होते; तर अशोक होळकर हे होळ (पाटीलवाडा) येथून कारखान्यात कामाला येत होते. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक असला, तरी त्यांची जिवलग मैत्री सगळीकडे परिचित होती. विशेष म्हणजे हे दोघे सोमेश्वर कारखान्यात एकाच दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबर २००१ रोजी असिस्टंट फायरमन या पदावर रुजू झाले होते. त्यामुळे एकत्र काम, एकत्र जेवण, फिरायला एकत्र जाणे, सुख-दुःखात एकाच वेळी सामील होणे यामुळे त्यांची मैत्री घट्ट होत गेली. एकाच दिवशी दोघांनाही देवाज्ञा झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT