Latest

पुणे: सराईत गुन्हेगार 2 वर्षांसाठी तडीपार

अमृता चौगुले

पुणे: लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. गणेश शिवाजी चौधरी (वय 24), अजय शाम विश्वकर्मा (वय 20, राहणार कुंजीरवाडी) अशी दोघांची नावे आहेत.

दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून, दोघे टोळी तयार करून परिसरात गुन्हे करत होते. स्थानिक नागरिक, व्यावसायिकांना शस्त्राच्या धाकाने धमकावत होते. त्यांच्यावर योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT