Latest

उत्तराखंडात भूस्खलन; दोन मुलांचा मृत्यू

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी भूस्खलन होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला. रामपूरमधील एक हॉटेल वाहून गेले, तर उत्तरकाशीतील रस्ता तुटला. पौडी गढवाल आणि काठगोदाममध्ये अडकलेल्या सुमारे 165 लोकांना वाचवण्यात आले आहे.

जम्मू-काश्मिरातही भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह सात राज्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नेपाळ आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे बगहातील गंडक नदीची पाणी पातळी वाढली असून बुधवारी सकाळी वाल्मिकीनगरमधील गंडक डॅमचे सर्व 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून रोज 2 लाख 92 हजार क्यूसेक पाणी सोडले जात असून यामुळे पश्चिम चंपारण्याच्या खालील भागात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या ठिकाणी हाय अलर्ट जारी केला आहे.

SCROLL FOR NEXT