Latest

Twitter Lays Off In India : भारतात ट्विटरमध्ये डझनभरच कर्मचारी; एलॉन मस्क यांनी खाल्ला ९० टक्के रोजगार

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : एलॉन मस्क यांच्या ट्विटर अधिग्रहणानंतर कपात धोरण अधिक तीव्र झाले. ट्विटरनेमध्ये भारतातील ९० टक्के पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. एलोन मस्क यांनी जगभरातील केलेल्या कर्मचारी कपातीचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीने भारतात २०० हून अधिक लोकांना रोजगार दिला होता, आता कर्मचारी कपातीनंतर फक्त डझनभर कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. आत उरलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत अधिक वाढ आणि भूमिकांमध्ये बदल होतील असे संकेत देण्यात आले आहेत. (Twitter Lays Off In India)

सोशल मीडिया कंपन्यांसाठी भारत मोठी बाजारपेठ (Twitter Lays Off In India)

भारत जागतिक इंटरनेट कंपन्यासाठी मोठी बाजारपेठ समजली जाते. ट्वीटर सह मेटा आणि अल्फाबेट गुगलसारख्या भारतात मोठी सेवा देतात. भारतात बरेच इंटरनेट वापरकर्ते आहेत परंतु या प्लॅटफॉर्मना कठोर नियम आणि भारतीय आयटी नियम, 2021 चे पालन करावे लागते. मस्कला अपेक्षा आहे की ते करत असलेल्या बदलांमुळे प्लॅटफॉर्मची कमाई वाढेल. अशा कंपन्यांवर युजर्ससुद्धा खूप विश्वास ठेवतात. तरीही अशा कंपन्यांकडून कर्मचारी कपातीसारखे धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. (Twitter Lays Off In India)

या प्रकरणाशी जवळीक असलेल्या एका सूत्राने सांगितले की, भारतामध्ये ट्वीटरने ज्या ७० टक्के नोकऱ्या कपात केल्या आहेत. त्या उत्पादन आणि अभियांत्रिकी विभागाशी संबंधित आहेत. याशिवाय मार्केटिंग, सार्वजनिक धोरण आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनशी संबंधित पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे. ट्विटरने जागतिक स्तरावर सॅन फ्रॅन्ससिको, कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणाहून निम्म्याहून अधिक लोकांना कामावरुन कमी केलेले आहे. आता फक्त 3,700 कर्मचारी त्याचा भाग आहेत. (Twitter Lays Off In India)

ट्विटरची भारतातील तीन शहरांमध्ये कार्यालये 

ट्विटर इंडियाची कार्यालये मुंबई आणि बंगळूर व्यतिरिक्त देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आहेत. भारतात, भाषण व स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवरुन ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये अनेक वेळा संघर्षाची परिस्थितीही निर्माण झाली होती. मस्ककडून करण्यात येत असलेल्या बदलांसोबतच ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सेवाही लवकरच भारतात सुरू करणार असून आता वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील.

राजकारण्याकडून ट्वीटरचा सर्वाधिक वापर

भारता राजकारणी लोक ट्वीटरचा सर्वाधिक वापर करताना दिसून येते. एकमेकांवर आरोप प्रत्योरोप करणे व एकूण राजकीय वातावरण निर्मितीसाठी याचा सर्रास वापर केला जातो. देशातील अनेक पक्ष नियमितपणे याचा वापर करताना दिसून येतात. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ८४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसोबत भारतातला हा सर्व पसरा कसा काय कंपनी सांभाळणार हे ट्विटरने अद्याप स्पष्ट केले नाही. भारतात ट्विटर १०० हून अधिक भाषांमध्ये काम करते.

ट्विटरचे भारतामध्ये नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळूरु येथे कार्यलय आहे. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या माहितीनुसार जगभरात ट्विटरचे आता ३७०० कर्मचारी उरले आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT