Latest

History Hunter मध्ये दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांची कहाणी उलगडणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षक 'हिस्टरी हंटरच्या' थरारक अंतिम भागाची वाट बघत आहेत, (History Hunter) ज्यामध्ये मनीष पॉल सध्याच्या सीजनमधील सर्वांत शेवटचा शोध घेणार आहे. या भागात दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांच्या रहस्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. (History Hunter)

संबंधित बातम्या –

मुघल राजघराण्याच्या नौलखा हाराचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या भागामध्ये दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी लपून जाण्याची योजना कशी आखली, हेही बघायला मिळेल. या हारामुळे त्यांना नेपाळमध्ये प्रवेश करता आला१४०० कोटींहून अधिक रकमेचा त्यांचा खजिना ब्रिटीशांना मिळाला असला तरी ब्रिटीश सेना कधीही नानासाहेबांना पकडू शकली नाही.

नानासाहेब पेशव्यांचे अखेरचे दिवस कसे गेले, हे आजही गूढ आहे. काही विशेषज्ज्ञांनी म्हटले की, त्यांचा मृत्यू मलेरियामुळे झाला तर काही जण त्यांना मक्का, मध्य पूर्व, रशिया व इतर भागांमध्ये बघितले असल्याचे सांगत राहिले. ते जीवंत असल्याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे ब्रिटिशांनी अंतिमत: १८९६ मध्ये त्यांची फाईल बंद केली.

'हिस्टरी हंटरच्या' अंतिम भागात ८ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी+ आणि डिस्कव्हरी चॅनलवर दुसऱ्या नाना साहेब पेशव्यांची ही जीवन कहाणी नक्की पाहा.

SCROLL FOR NEXT