Latest

Tejasswi Prakashचं सौंदर्य नजरेत भरणारं, नेटकरी म्हणाले-पाण्यात आग लावली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीची 'नागिन', अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मस्टर्ड यलो कलर ड्रेस परिधान केलाय. ज्यामध्ये ती बोल्ड आणि सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती बीचवर उभारून पोज देताना दिसतेय.

तेजस्वी ही बिग बॉस १५ ची विजेती आहे. तेजस्वी सध्या गोवामध्ये व्हेकेशनवर आहे. बीचवर तिने काही लक्षवेधी फोटो क्लिक केलेत. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी कॉमेंट्‌ बॉक्समध्ये म्हटलंय-तेजस्वी तू तर पाण्यात देखील आग लावलीस.

तेजस्वी प्रकाश गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतेय. समुद्रकिनारी आपल्या मदमस्त अदांमध्ये ती फोटो पोज देताना दिसतेय. तेजस्वी फोटोंमध्ये मस्टर्ड यलो कलरच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसते. तिचा हा लूक फॅन्सला इतना आवडला आहे की, फोटोंना १ तासामध्ये एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. तेजस्वी प्रकाश अखेरीस एकता कपूरची मालिका 'नागिन-६' मध्ये पाहण्यात आले होते. या मालिकेत तिने 'नागिन'ची भूमिका साकारली होती.

तेजस्वी प्रकाशने आपल्या सर्व फोटोजमध्ये कातिल अदा दिसत आहेत. हे फोटो पाहून फॅन्स वेडे झाले आहेत. तिच्या चेहऱ्याच्या हास्यावर सर्वांच्या नजरा टिकून राहिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT