Latest

Harminder Singh Kohli : अभिनेत्री नीलू कोहलीच्या पतीचा मृत्यू

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टिव्ही अभिनेत्री नीलू कोहलीचा पती हरमिंदर सिंह ( Harminder Singh Kohli ) यांचे निधन झाले. हरमिंदर सिंह हे गुरुद्वारामध्ये गेले होते. तेथूनच घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले असता त्यांना अचानक चक्कर येवून ते खाली कोसळले. यावेळी घरी नीलू यांचा मदतनीस होता. त्याने हरमिंदर यांना दवाखान्यात नेले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती नीलूची मैत्रीण वंदना अरोरा हिने सोशल मीडियावर दिली आहे. घटनेने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

निलूची मैत्रीण वंदना अरोरा हिने या दुख:द घटनेची माहिती देताना सांगितले की, 'काल दुपारी हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते. थोड्या वेळाने ते घरी परतल्यानंतर बाथरूममध्ये गेले. दरम्यान घरातील मदतनीस त्याचा जेवनासाठी वाट पाहत होता. बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नाहीत म्हणून त्याने बाथरुमचा दरवाजा उघडून पाहिलं तर ते जमिनीवर पडलले दिसले. यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र, यात त्याचा मृत्यू झाला.

वंदनाने पुढे सांगितले की, हरमिंदर सिंह ( Harminder Singh Kohli ) यांना मधुमेहाचा त्रास होता मात्र, ते सध्या बरे झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. हरमिंदर सिंह यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. असेही तिने सांगितले.

अभिनेत्री नीलूने 'हाउसफुल २', 'पटियाला हाउस', 'हिंदी मीडियम', 'जोगी' यांसारख्या हिट चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमठविला आहे. याशिवाय नीलूची 'यूनाइटेड कच्चे' ही वेब सीरिज लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. ही वेब सीरिज ३१ मार्च रोजी ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT