Latest

Tunisha Sharma : ‘त्याने मला फसवलं’, तुनिषाने अखेरीस काकांना केला होता फोन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) च्या मृत्यूनंतर अनेक मोठे खुलासे समोर येत आहेत. अभिनेत्रीचे फॅन्स आतापर्यंत या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. तुनिषाचे मित्र आणि कुटुंबीय धक्क्यात आहेत. दरम्यान, तुनिषाच्या काकांचा जबाब समोर आला आहे. तुनिषाचे काका म्हणाले- तुनिषाचा मला फोन आला होता. ती म्हणाली की, त्याने मला फसवलंय. (Tunisha Sharma)

तुनिषाचे काका म्हणाले-'ती मागील काही दिवसांपासून तणावात होती. तुनिषाला नॉर्मल राहायचं होतं. पण काही गोष्टी तिच्या मनाला लागल्या होत्या, ज्यामुळे ती तणावात होती. त्यामुळे १० दिवस आधी तिला एंजायटी ॲटॅक आला होता.'

काकांनी सांगितलं की, 'तुनिषा प्रेग्नेंट नव्हती. जेव्हा ते लडाख ट्रिपवर गेले होते. तेव्हा तिच्या आणि शीजानच्या दरम्यान, जवळीकता वाढली. दोघे एकमेकांशी तासनतास बोलायचे. तुनिषा शीजानच्या घरी जायची. शीजानच्या कुटुंबातील सदस्यांनाही तुनिषा आवडायची. मग, जेव्हा तिला एंजायटी अॅटॅक आला तेव्हा आम्हाला समजलं की, शीजान तिला धोका देत आहे. ही गोष्ट १६ डिसेंबरची आहे. तुनिषा सेटवर शूटिंग करत होती. तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. सेटवरील उपस्थित लोक तिला बोरीवली रुग्णालयात घेऊन गेले. जेव्हा आम्ही तेथे गेलो तेव्हा एकच गोष्ट म्हणत होती-'त्याने मला धोका दिला आहे, तो माझ्यासोबत असं कसं करु शकतो?"

काका म्हणाले की-'ती नेहमी चीटिंगच्या गोष्टी करत होती. यानंतर तिच्या आईने शीजानलादेखील समजवलं होतं. त्याला नातं ठेवायंच नव्हतं तर त्याने इतकी जवळीकता का वाढवली? आम्ही म्हणतो की, याप्रकरणात जो कोणी दोषी आहे, त्याला शिक्षा मिळायला हवी.'

SCROLL FOR NEXT