Latest

Tunisha Sharma death case : वसई कोर्टाने शीझानचा जामीन अर्ज फेटाळला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. शीझान खान पोलिस कस्टडीमध्ये आहे. १३ जानेवारी रोजी शीझानच्या वकिलांनी वसई कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलाय. पण, वसई कोर्टाने शीझानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शीझान खानचे वकील आता मंगळवारी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करणार आहे. ((Tunisha Sharma death case)) याशिवाय, असेही वृत्त समोर आले आहे की, तुनिषाच्या परिवाराने वसई विरार सीपी मधुकर पांडे यांची भेट घेऊन पत्र दिलं आहे. यामध्ये शीझानच्या आईलादेखील केसमध्ये आरोपी बनवण्याची मागणी करण्यात आलीय. कमिश्नरनी वालीव पोलिसांना शीझानच्या आई विरोधात दिलेल्या तक्रारीवर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. (Tunisha Sharma death case)

शीझानवर गंभीर आरोप

शीझान खानच्या बहिणी शफक नाज आणि फलक नाज वसई कोर्टात पोहोचल्या होत्या. सोबत शीझानची आईदेखील स्पॉट झाली. यासिवाय तुनिषा शर्माचे वकील तरुण सिंहदेखील उपस्थित होते. तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी टीव्ही मालिका 'अलीबाबाः दास्तां-ए-काबुल'च्या सेटवर आपले जीवन संपवले होते. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तुनिषाला मृत घोषित केलं होतं. यानंतर तुनिषाच्या आईने शीझानवर अनेक गंभीर आरोप केले होते. तिचं म्हणणं होतं की, शीझानने तुनिषाला थप्पड मारली होती. त्याचबरोबर, तो तिला उर्दूदेखील शिकवत होता. तुनिषाला आपला धर्मदेखील बदलण्यास सांगत होता.

SCROLL FOR NEXT