Latest

पुणे : मध्यराञी दरी पुलावर ट्रकचा अपघात; दोन जखमींची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जांभुळवाडी दरी पुल येथे साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने निघालेला एक मोठा ट्रक ६ डिसेंबरला साडे तीनच्या सुमारास पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी अवस्थेत अडकला असल्याची वर्दी सिहंगड अग्निशमन केंद्राला मिळताच अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता केबिनमधे जखमी अवस्थेत अडकलेल्या चालकाशी संवाद साधून धीर देत शिवाजी मुजूमले आणि शिवाजी आटोळे या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने चालकाला पंधरा मिनिटात बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.

परंतू रस्त्यावर पलटी झालेला ट्रक पाहून एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना मदतीकरिता पुढे आला. मात्र, त्या ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेतल्याने सदर दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतःचा बचाव करण्यासाठी दरीपुलावरुन खाली उडी मारली. काही वेळाने त्याच्या ओरडण्याचा आवाज तेथील स्थानिक लोकांना आला. दलाचे जवान आणि उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दुर केला आहे. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे शिवाजी मुजूमले, फायरमन शिवाजी आटोळे, मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवानही मदतीकरिता दाखल झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT