Latest

Nasal Vaccine : देशातील पहिल्‍या कोरोना नोझल व्हॅक्सिनची चाचणी पूर्ण, सर्व कसोटींवर यशस्‍वी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत बायोटेकच्‍या देशातील पहिल्‍या नोझल व्हॅक्सिनचे (नाकाव्‍दारे देण्‍यात येणारी लस) तिसर्‍या टप्‍प्‍यातील परीक्षण पूर्ण झाले आहे. कोरोना व्हॅक्सिन बीबीवी -154 ही कोरोनाचा मुकाबला करण्‍यासाठीची बुस्‍टर लस आहे. तसेच ही कसोटींवर ती यशस्‍वी ठरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना व्‍हॅसिन बीबीवी -154 ही पहिल्‍या आणि दुसर्‍या टप्‍प्‍यातील परीक्षण यापूर्वी यशस्‍वी ठरले होते. आता तिसर्‍या टप्‍प्‍यात दोन डोस घेतलेल्‍यांना बुस्‍टर डोस म्‍हणून या लसीचा वापर करण्‍यात येईल का याचे परीक्षण करण्‍यात आले. तिसर्‍या टप्‍प्‍यातील परीक्षणातील आकडेवारी राष्‍ट्रीय नियामक प्राधिकरणाला पाठविण्‍यात आली आहे.

भारत बायोटेकच्‍या नोझल व्हॅक्सिनचे पहिल्‍या टप्‍प्‍यातील परीक्षण यशस्‍वी ठरले होते. यानंतर पुढील परीक्षणातील सर्व कसोटीवर हा डोस यशस्‍वी ठरल्‍याने आता कोरोनाचा प्रतिबंध करण्‍यासाठी आणखी एक शस्‍त्र रुग्‍णांच्‍या हाती असणार आहे. आता राष्‍ट्रीय नियामक प्राधिकरणाकडून याला हिरवा कंदील मिळाला की पुढील प्रक्रिया राबविण्‍यात येणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT