Latest

Biggest Train Accidents In India | २०११ नंतर घडले ‘हे’ ८ मोठे रेल्वे अपघात, ओडिशाातील अपघाताने २०१६ मधील दुर्घटनेच्या आठवणी झाल्या जाग्या

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातातील मृतांचा आकडा २३८ वर पोहोचला आहे. तर या अपघातात सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. (Biggest Train Accidents In India)

२०१२ सालापासून असे सात मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. यातील सर्वाधिक रेल्वे अपघात उत्तर प्रदेशात झाले आहेत. गेल्या १० वर्षात झालेल्या मोठ्या रेल्वे अपघातांबाबत जाणून घेऊया ज्यांनी रेल्वे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण केली होती.

गेल्या 10 वर्षात घडलेले मोठे रेल्वे अपघात :

1) वर्ष 2011 : 7 जुलै रोजी उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात छपरा-मथुरा एक्स्प्रेसची बसला धडक झाली होती. या घटनेत 69 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. हा अपघात रात्री 1.55 वाजता झाला होता. रेल्वेचा वेग खूप होता, क्रॉसिंगवर बसला धडकल्यानंतर बस अर्धा किलोमीटर फरफटत गेली होती.

2) वर्ष 2012 : 22 मे रोजी आंध्र प्रदेशजवळ मालगाडी आणि हुबळी-बंगळूर हम्पी एक्स्प्रेसची रेल्वे टक्कर झाली. रेल्वेचे चार डबे रुळावरून घसरले. त्यातील एका डब्याला आग लागल्याने सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 43 जण जखमी झाले होते.

3) वर्ष 2014 : 26 मे रोजी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर भागात गोरखपूरच्या दिशेने जाणारी गोरखधाम एक्स्प्रेस खलीलाबाद स्टेशनजवळ थांबलेल्या मालगाडीला धडकली होती. ज्यात 25 जण ठार तर 50 हून अधिक जखमी झाले होते.

4) वर्ष 2016 : 20 नोव्हेंबर रोजी, उत्तर प्रदेशातील कानपूर शहरापासून 100 किमी दूर असलेल्या पुखरायनजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेस 19321 चे 14 डबे रुळावरून घसरले. यात 150 प्रवासी ठार आणि 150 हून अधिक जखमी झाले होते.

5) वर्ष 2017: 23 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील औरैयाजवळ दिल्लीहून जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले. यात सुमारे 70 लोक जखमी झाले होते.

6) वर्ष 2017 : 18 ऑगस्ट रोजी, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेस रुळावरून घसरली होती. या अपघातात 23 जण ठार आणि सुमारे 60 जण जखमी झाले होते.

7) वर्ष 2022 : 13 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार भागात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले होते.

8) वर्ष 2023 : ओडिशात २ जूनच्या सायंकाळी झालेली भीषण अपघात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. 2 जून रोजी, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळूर-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी रुळावरून घसरल्याने २३८ लोक ठार झाले आणि 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. (coromandel express train accident)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT