Latest

चांदणी चौकातील काम संपेपर्यंत दररोज रात्री अर्धा तास वाहतूक असणार बंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील अडचणीचा ठरणारा जूना पूल पाडल्यानंतर नवीन पुलाच्या कामासाठी लगतचे खडक फोडण्याचे काम सुरु आहे. हे काम  आठवडाभर सुरू राहील, अशा अंदाजाने या मार्गावरील वाहतूक पुढील आठवडाभरापर्यंत दररोज रात्री १२.३० ते १ (अर्धा तास) बंद ठेवण्यात येणार आहे, दरम्यानच्या काळात या महामार्गावरील वाहने जुन्या बाह्य वळणानुसार मार्गस्थ होतील, अशी माहिती भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

चांदणी चौकातील जूना पूल पाडल्यानंतर नवीन पूलासाठीचे काम सुर आहे. त्या अनुषंगाना जून्या पूलालगत असणाऱ्या खडकांच्या टेकड्या आहेत. या खडक जिलेटीनच्या कांड्यांद्वारे उध्वस्त करण्यात येत असून मागील दोन दिवसांपासून दररोज काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तसेच याबाबत वाहतूक पोलिसांकडून किंवा एनएचएआयकडून कुठलीच पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने मुंबई सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी होत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत वाहतूक पोलिसांनी किंवा एनएचएआयने कुठलीच पूर्वकल्पना दिली नसल्याने वाहतूक कोंडीचा त्रास अजूनही करावा लागतो आहे, अशा प्रतिक्रिया देत नागरिकांमधून संताप व्यक्त केला गेला. अखेर एनएआयला उशिरा जाग येत परिपत्रक काढून चांदणी चौकातील महामार्गालगतच्या दोन्ही बाजूच्या टेकड्या फोडण्यासाठी छोटे स्फोट करण्यात येणार आहे. या कामासाठी आठवडा लागण्याची शक्यता असल्याने दररोज रात्री १२.३० ते १ अशी अर्धा तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

SCROLL FOR NEXT