Latest

पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे गोव्यात वाहतुकीत बदल

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दि. 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दाबोळी विमानतळ ते फातोर्डा स्टेडियमपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याच प्रमाणे दाबोळी ते मडगाव तसेच मडगाव शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

'हे' मार्ग असणार बंद

हंसा ते बिर्ला क्रॉस
नवीन झुआरी पूल ते बिर्ला क्रॉस – टायटन
केसरवाल मॉटेल ते सारावली जंक्शन (वेस्टर्न बाय पास)
होलसेल फिश मार्केट सारावली ते ओल्ड मार्केट सर्कल
ओल्ड मार्केट सर्कल – दामबाब सर्कल – फातोर्डा चार रस्ता जंक्शन – आर्ले जंक्शन
अंबाजी जंक्शन – पाद्रे पेदृ फेर्राव रोड ते फातोर्डा चार रस्ता जंक्शन – ओल्ड मार्केट
मडगाव शहर ते ओल्ड मार्केट
मुरीडा रोड – कॅनरा -एटीएम ते फातोर्डा चार रस्ता जंक्शन
कदंब बसस्थानकाच्या मागून जॉगर्स पार्ककडे पर्यायी मार्ग (दाबोळी विमानतळ) उत्तर (पणजीच्या दिशेने)
आगशी-ओल्ड झुआरी पूल-कुठ्ठाळी जंक्शन-सेंट जेसिंतो बेट-चिखली जंक्शन-विमानतळ जंक्शन-दुभाजक-विमानतळ
मडगाव/ फोंड्याच्या दिशेने
इस्टर्न बाय पास – आर्ले सर्कल – राय – बोरी टोलनाका – सेंट जेसिंतो बेट-चिखली जंक्शन-विमानतळ जंक्शन-दुभाजक-विमानतळ
पर्यायी मार्ग (दक्षिण ते उत्तर)
वास्को ते पणजी/उत्तर
चिखली जंक्शन-सेंट जेसिंतो बेट-कुठ्ठाळी-नवीन झुआरी पूल
मडगाव ते पणजी/ उत्तर
इस्टर्न बायपास – आर्ले सर्कल – राय – बोरी टोलनाका – कुठ्ठाळी जंक्शन – नवीन झुआरी पूल

शहर वाहतूक नियोजन

कोलवा ते मडगाव शहर: कोलवा – माडेल – रिंग रोड – रेल्वे गेट कोंब – पालिका गार्डन
फातोर्डा ते मडगाव शहर : मुरीडा – आगळी – बोर्डा – होली स्पिरीट – ओल्ड हॉस्पिसिओ
नुवे ते मडगाव शहर: नुवे – गोवा राजी – आर्ले – बोर्डा – होली स्पिरीट – ओल्ड हॉस्पिसिओ
उद्घाटन समारंभ स्टेडियमकडे जाणारा मार्ग
उत्तर ते फातोर्डा: (बस) नुवे – जिल्हा रुग्णालय – ओल्ड मार्केट – रवींद्र भवन (पार्किंग: केटीसी बस स्थानक)
दक्षिण ते फातोर्डा: (बस) इस्टर्न बायपास – आर्ले – नुवे – जिल्हा रुग्णालय – ओल्ड मार्केट – रवींद्र भवन (पार्किंग: केटीसी बस स्थानक)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT