Latest

…तर फ्रीजमधील टोमॅटो अपायकारक!

Arun Patil

मेक्सिको : एरवी आपण फळे, भाज्या आणतो, त्यावेळी ती ताजेतवानी रहावीत, खराब होऊ नयेत, यासाठी फ्रीजमध्ये ठेवत असतो. किंबहुना हे आता आपल्या अंगवळणीच पडले आहे. आता काही दिवस भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून वापरण्यास काहीच हरकत असणार नाही. पण, ते अधिक काळ फ्रीजमध्ये ठेवून खाणे आरोग्यासाठी चांगले असत नाही, असे एका अभ्यासातून अधोरेखित होते आहे. विशेषत: टोमॅटो जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याचे प्रमाण खूपच आहे आणि त्याचा आपल्यावर कळत-नकळत मोठा फरक पडत असतो.

टोमॅटो फ्रीजमध्ये बराच काळ ताजे राहू शकतात आणि ते ठेवलेही जातात. पण, असे केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे गुणधर्म बदलतात. टोमॅटोमधील लाइकोपीन अँटीऑक्सिडंट लाल रंग देते. पण थंडीमुळे त्याचे 'ग्लायकोआल्कलॉइड्स'मध्ये रूपांतर होते. याला 'टोमॅटिन ग्लायकोआल्कलॉइड'देखील म्हणतात. हे आरोग्यासाठी खूप वाईट आहे. त्यामुळे टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून खाणे टाळावे.

टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि वास दोन्ही बदलतात. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पडदा तुटतो, त्यामुळे टोमॅटो लवकर कुजतात. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले टोमॅटो अपायकारक असू शकतात. फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्याने 'टोमॅटिन ग्लायकोआल्कलॉइड्स' तयार होतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात. असे टोमॅटो खाल्ल्याने आतड्याला सूज, मळमळ, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. हे यकृत आणि मूत्रपिंडासाठी देखील खूप वाईट आहे. हे टाळण्याकरिता टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरला ठेवून वापरणे अधिक रास्त ठरते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT