Latest

Neeraj Chopra : सुभेदार नीरज चोप्रा यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा सन्मान मिळणार आहे. नीरजला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नीरज चोप्रा हा सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला हा सन्मान देण्यात येत आहे. ही माहिती एननआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवरून दिली आहे.

नीरज चोप्रा हा भारतासाठी ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूने ८७.५८ मीटर लांब भालाफेकून सुवर्णपदकाची कमाई केली होती.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) राष्ट्रपती भवनात ३८४ संरक्षण जवानांना शौर्य आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करतील. यात १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदके, चार उत्तम युद्ध सेवा पदके, ५३ अति विशिष्ट सेवा पदके, १३ युद्ध सेवा पदके, तीन बार टू सेना पदके यांचा समावेश आहे.

दरम्यान, भारताच्या संरक्षण गुप्तचर संस्थेचे (DIA) प्रमुख लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लन यांनाही परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

SCROLL FOR NEXT