Latest

‘पुढारी-टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सव 2023’चा आज बंपर ड्रॉ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे मिळवून देणार्‍या दैनिक 'पुढारी' आणि 94.3 टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 चा बंपर ड्रॉ शनिवार, दि. 23) रोजी होणार आहे. हा कार्यक्रम पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, मैदान येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत 'शॉपिंग उत्सव 2023'मध्ये सहभागी ग्राहकांपैकी भाग्यवान बक्षीस विजेत्यांची नावे जाहीर होणार आहेत.

या कार्यक्रमाला एसएस कम्युनिकेशनचे अतुल भांड, तनिष्कचे जय कामत, क्रिडाईचे अध्यक्ष कृष्णात खोत, अशोकराव माने ग्रुपचे विजयसिंह माने, चकोते ग्रुपच्या सुप्रिया डांगे, वारणा ग्रुपचे विश्वेश कोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

या उत्सवात सहभागी दुकानातून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन्स देण्यात आली होती. ती कुपन्स भरून ग्राहकांनी संबंधित दुकानात जमा केली होती. त्या ग्राहकांमधून या भाग्यवान विजेत्या ग्राहकांची नावे ड्रॉ पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते काढण्यात येणार आहेत.

दसरा-दिवाळीच्या काळात 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा शॉपिंग उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात सहभागी होत असंख्य कोल्हापूरकरांनी खरेदीचा आनंद लुटला होता.

ड्रॉ पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान बक्षीस विजेत्या ग्राहकांच्या नावाचे कुपन्स काढून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. या बंपर ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस इलेक्ट्रिक बाईक असून सोने, स्मार्टफोन, ब्लेंडर, फूड प्रोसेसर, ओव्हन यासह अन्य भरपूर सरप्राईज गिफ्ट सहभाग ग्राहकांना मिळणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT